लिंबाजी इंगावले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; गोशाळेत चारा वाटप, - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लिंबाजी इंगावले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; गोशाळेत चारा वाटप,

राहुरी(वेबटीम) मानव अधिकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी इंगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम...

राहुरी(वेबटीम)



मानव अधिकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी इंगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत डोंगरगण येथील गोशाळेतील जनावरांना चारा वाटप करण्यात आले. तसेच डोंगरगण देवस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मानव अधिकार संरक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गोशाळेतील जनावरांना चारा उपलब्ध करून देत गोसेवेचा उपक्रम राबविण्यात आला, तर देवस्थान परिसरात भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

यावेळी अरुण खुरुद, दत्तात्रय गडाख, भिकचंद वरघुडे, संदीप कदम, कारभारी चव्हाण, अशोक हुडे, बाबासाहेब येवले, अरविंद मोढावे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उपक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत अशा समाजहिताच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले.



दरम्यान, वाढदिवसानिमित्त मुरलीधर कदम, नानासाहेब पठारे, शिवाजी मुसमाडे, बाळासाहेब खुरुद आदी मान्यवरांनी लिंबाजी इंगावले यांचा सत्कार केला. यावेळी इंगावले यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत