मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्विवाद वर्चस्व अगोदरच १८ जागा बिनविरोध. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्विवाद वर्चस्व अगोदरच १८ जागा बिनविरोध.

नेवासा (तालुका प्रतिनिधी) मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा आपल...

नेवासा (तालुका प्रतिनिधी)



मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी आमदार विठ्ठलराव लंघे उद्योगपती प्रभाकर शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे डिपाॅझिट जप्त झाले.शुक्रवार (दि. २६) रोजी सभासद मतदार संख्या १६९४१ पैकी ८३९५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला एकुण मतदान टक्केवारी ४९.५५ झाले. होते.मतमोजणी शनिवार दि.२७ रोजी नेवासा येथे पार पडली उमेदवारी अर्ज माघारीनंतर गडाख गटाच्या १८जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधीची दोन जागा यासाठीच निवडणूक पार पडली.

करजगांव गटातुन  मंत्री गडाख यांच्या सहकार पॅनलचे१) चंद्रकांत भानुदास टेमक (६८९४) २) डॉ ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६७२५) महिला राखीव कमल चांगदेव दहिफळे (७४०१) विमल नारायण सोनवणे (७१९१) अपक्ष दिवटे मिराबाई भाऊसाहेब (१०००)

पराभूत करजगांव गट आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योगपती प्रभाकर शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे १) किरण लक्ष्मण जाधव (१०४१) २) नारायण दत्तात्रय डौले (८४७) अपक्ष गोरक्षनाथ मोहन जाधव (२०४) बाद मतं (३२५)


 विरोधी आमदार लंघे शिंदे गटाकडून सर्व जागांवर लढत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने विरोधी पॅनलवर केवळ तीन जागांसाठी निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली होती.

माजी मंत्री शंकरराव गडाख सहकार पॅनलचे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये सोनई गटातून वसंत चिमा कुसळकर, छाया भास्कर भुसारी व दिनकर अंबादास घावटे यांचा समावेश आहे. घोडेगाव गटातून लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप व दत्तात्रय भानुदास बऱ्हाटे, तर खरवंडी गटातून बापूसाहेब शंकर शेटे, भाऊसाहेब निवृत्ती मोटे व सोपान विठ्ठल विरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

नेवासा गटातून बाळासाहेब पुंजाजी भणगे व त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, तर प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील व पांडुरंग श्रीरंग निपुंगे यांची निवड झाली आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून शंकरराव यशवंतराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर पंढरीनाथ कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब हरिभाऊ भालके आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून बाळासाहेब भाऊलाल परदेशी हे बिनविरोध संचालक झाले होते. 

गुलालाची उधळण करत नुतन संचालक तसेच कार्यकर्त्यांनी आनंद लुटला.नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांची मजबूत पकड पुन्हा एकदा दिसून आली. 

निवडणूक निर्णय अधिकारी प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी अप्रतिम असं नियोजन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत