राहुरी फॅक्टरीत उद्या गुरुवारी विघ्नहर्ता क्लिनिकचा उद्घाटन समारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या गुरुवारी विघ्नहर्ता क्लिनिकचा उद्घाटन समारंभ

राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विघ्नहर्ता क्लिनिकचा उद्घाटन समा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विघ्नहर्ता क्लिनिकचा उद्घाटन समारंभ गुरुवारी, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

श्रीरामपूर रोडवरील युनिटी मेडिकेअर शेजारी, श्री दत्त कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू होत असलेल्या या क्लिनिकच्या उद्घाटनासाठी परिसरातील नागरिक, डॉक्टर, केमिस्ट तसेच मित्रपरिवाराने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान, श्री क्षेत्र ताहाराबादचे महंत अर्जुन महाराज तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

क्लिनिकचे उद्घाटन श्री. नामदेव दादा पाखरे, डॉ. श्री. प्रविण नामदेव पाखरे, सौ. द्वारका नामदेव पाखरे व डॉ. सौ. वैष्णवी प्रविण पाखरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

नवीन क्लिनिकमुळे राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा अधिक सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत