राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा मानव अधिकार संरक्षण समिती, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने नुकता...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा मानव अधिकार संरक्षण समिती, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
मानव अधिकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी इंगवले यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्यासाठी पोलीस निरीक्षक देशमुख यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मानव अधिकार संरक्षण समितीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गडाख, संघटक भिकचंद वरघुडे, राहुरी तालुका जनसंपर्क अधिकारी अण्णासाहेब कराळे, तालुका उपाध्यक्ष कारभारी चव्हाण यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी उपस्थितांनी पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही मानव अधिकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत