देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी दासुभाऊ पठारे मित्र मंडळाच्या वतीने भव्य नगरसेवक चषक २०२६ प्लास्टिक बॉल ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी दासुभाऊ पठारे मित्र मंडळाच्या वतीने भव्य नगरसेवक चषक २०२६ प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. १९ जून २०२६ पासून सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार असून सदर स्पर्धा शांताबाई कदम मंगल कार्यालयासमोर, देवळाली प्रवरा येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी १,१०० रुपये ठेवण्यात आली असून विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे.
प्रथम क्रमांकासाठी नगरसेवक दासुभाऊ पठारे यांच्या वतीने ₹२१,१११, द्वितीय क्रमांकासाठी नगरसेविका पल्लवी वैभव ढुस यांच्या वतीने ₹११,१११, तृतीय क्रमांकासाठी दासुभाऊ पठारे मित्र मंडळाकडून ₹७,७७७ तर चतुर्थ क्रमांकासाठी नगरसेविका आशाताई केदारनाथ चव्हाण यांच्यावतीने ₹५,५५५ चे बक्षीस देण्यात येणार आहे.
याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द मॅच, सलग सहा षटकार आणि सलग चार चौकार मारणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ₹१,००० चे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेस ट्रॉफी सौजन्य उद्योजक प्रशांत काळे तर मंडप सौजन्य जावेद सय्यद संक्रापुर यांनी केले आहे.
स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील. सर्व सामने ४ षटकांचे राहतील, तर अंतिम सामना ५ षटकांचा खेळविण्यात येणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून वाद घालणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळ व आप्पासाहेब ढुस मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तर अधिक माहितीसाठी प्रसाद ढुस (९५९५८५१४९७), विकास ठुबे (७४४८१०४०१३) व शुभम बटवाल (७०३०७२४७९०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
परिसरातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दासुभाऊ पठारे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत