कर्जत तालुक्यातील राशीन येथे उद्या साई आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्जत तालुक्यातील राशीन येथे उद्या साई आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचा शुभारंभ

राहुरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे मुख्य शाखा असलेली साई आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील नवीन शाखेचा श...

राहुरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी येथे मुख्य शाखा असलेली साई आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील नवीन शाखेचा शुभारंभ उद्या गुरुवार, दि. १८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंबा देवी ट्रस्टचे विश्वस्त विश्वनाथ आंधळकर राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीराजे भोसले, सुरेशराव वाबळे, कडूभाऊ काळे, राजेंद्र देशमुख, शामराव कानगुडे, बबनराव जंजिरे, अल्लाउद्दीन काझी, विजयराव मोहोळे, शंकरराव देशमुख, नारायण जगताप, दादासाहेब कानगुडे, भीमराव साळवे, बबनराव घोडे, तुकाराम साकळे, उद्धवराव नेवसे, आदिनाथ हजारे, राहुल सोनमाळी, दत्तात्रय गोसावी, ईश्वर आंधळकर, रामकिसन सावळे, दिलीपराव नथे, राजेंद्र देवगावकर, अप्पासाहेब बजाज, राजेंद्र राखत, गुलाबराव सोनवणे आणि पांडुजी भंडारी यांच्यासह राशीन परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शुभारंभ सोहळ्यास राशीन व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साई आदर्श परिवाराचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत