शिक्षणासाठी अनाथ मुलीला मदतीचा हात.* 📌*5 मिनिटांत उभी राहिली 15 हजारांची फी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षणासाठी अनाथ मुलीला मदतीचा हात.* 📌*5 मिनिटांत उभी राहिली 15 हजारांची फी

देवळाली प्रवरा - दि.१५ जुलै २०२६ आई-वडील दोघेही नसताना केवळ पैशांअभावी शिक्षण थांबणार या भीतीने सैरभैर झालेल्या मुसळवाडीच्या कु. आरती (नाव ब...


देवळाली प्रवरा - दि.१५ जुलै २०२६



आई-वडील दोघेही नसताना केवळ पैशांअभावी शिक्षण थांबणार या भीतीने सैरभैर झालेल्या मुसळवाडीच्या कु. आरती (नाव बदलले आहे) या अनाथ मुलीच्या बीएससीच्या प्रवेशासाठी समाजाने एकत्र येत अवघ्या 5 मिनिटांत मदतीचा हात पुढे केला. सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांच्या आवाहनानंतर दानशूरांच्या मदतीने आरतीचे राजर्षी शाहू महाविद्यालयात आज दि.१५ जुलै रोजी बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश निश्चित झाला आहे.


दुःखाचा डोंगर, पण जिद्द कायम..  

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आरतीचे वडील.. ती अवघी 4 वर्षांची असतानाच वारले. आईने दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून तिला दहावीपर्यंत शिकवले. दहावी ते बारावीच्या दरम्यान आई आजारी पडली. आजोबांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बारावीच्या परीक्षेपूर्वीच आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगातही आरतीने बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मात्र घरात प्रचंड दारिद्र्य असल्याने पुढील शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला.


एक दिवसाची मुदत, आणि धावपळ..  

आरतीच्या आईचे माहेर देवळाली प्रवरा येथे असल्याने तिची आजी वाल्हुबाई या शेटे वाडी येथे मोलमजुरी साठी आल्या असताना त्यांनी आपली व्यथा देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन सोपान शेटे यांचे चिरंजीव नगरसेवक सचिन शेटे यांना सांगितली. त्याच दिवशी शाहू महाविद्यालयात बीएससीच्या प्रवेशाचा शेवटचा दिवस आणि 22,475 रुपये फी भरणे आवश्यक होते.


वेळ न दवडता सचिन शेटे यांनी राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस यांच्याशी संपर्क साधला. शासकीय मदतीची वाट न पाहता ढूस यांनी काही व्हॉट्सअँप ग्रुपवर आरतीची व्यथा मांडून तातडीने मदतीचे आवाहन केले.


5 मिनिटांत प्रतिसाद, समाज उभा राहिला..  

ढूस यांच्या आवाहनाला अवघ्या 5 मिनिटांत प्रतिसाद मिळाला. देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या विजया दीदींनी मदतीचे आश्वासन दिले. मुंबईतील एका संस्थेनेही दरवर्षी 95% फी भरण्याची तयारी दर्शवली. मात्र तातडीने या वर्षाची फी भरणे गरजेचे असल्याने ढूस यांनी पुढाकार घेतला.


आप्पासाहेब ढूस यांच्या फोन-पे वर खालील दानशूरांनी लगेच मदत जमा केली:

1. शिवाजीराव कपाळे - साई आदर्श मल्टिस्टेट चेअरमन - 4,000 रु.

2. तुकाराम (दासू) पठारे - देवळाली नगरपरिषद काँग्रेस गटनेते - 2,000 रु.

3. वैभव आप्पासाहेब ढूस - अंतः अस्ति प्रारंभ  -  लेखक -  2,000 रु.

4. प्रशांत रामभाऊ काळे - राहुरी अर्बन पतसंस्था चेअरमन - 2,000 रु.

5. प्रदीप लक्ष्मण येवले - साई सेवा पतसंस्था चेअरमन - 1,000 रु.

6. जयश्री सतीश तनपुरे - शुभकिर्ती ग्रुप / ओम शांती केंद्र - 2,000 रु.

7. सोनल अक्षय घोरपडे - इंजिनिअर /ओम शांती केंद्र - 1,000 रु.

8. चंद्रकला सुदामराव मुसमाडे - गृहिणी/ ओम शांती केंद्र 1,000 रु.

9. हर्षदा बापूसाहेब पुजारी - शिक्षिका /ओम शांती केंद्र - 1,000 रु.

10. योजना सोमनाथ लोखंडे - योग प्रशिक्षक /ओम शांती केंद्र - 500 रु.


प्राचार्यांनीही दिली सवलत..

एकूण 15,725 रुपये जमा झाल्यानंतर आरतीसह सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस, सचिन शेटे आणि शरद खांदे यांनी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वाती हापसे मॅडम यांची भेट घेतली. मॅडमने 22,475 रुपये फी मधील उर्वरित रक्कम माफ करून सहकार्य केले. अखेर ढूस यांनी आरती 15,725 रुपये फी भरून तिचा बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश निश्चित केला.


"आणखी एक मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये"..  

यावेळी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले, "मागील वर्षी फीअभावी एका मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचली होती. त्यामुळे कोणतीही अनाथ मुलगी केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, याच भावनेतून हे आवाहन केले. तातडीने मदत करणाऱ्या सर्व दानशूरांचे मनापासून आभार."


आरतीने सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले असून, आईचे स्वप्न पूर्ण करून मोठे होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत