राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही शाळेत ये-जा करत असताना आरोपी रिशाद ( पूर्ण नाव माहिती नाही, रा. अंबिका नगर, राहुरी कारखाना) हा तिचा वारंवार पाठलाग करत असे. आरोपी रिशाद हा तिच्याकडे मोबाईल नंबर लिहिलेल्या चिठ्ठ्या फेकून नको असलेली जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.
दिनांक ११ जुलै २०२६ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास पिडीत मुलगी बाथरूमला गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इतकेच नाही तर, त्याने मुलीला घाबरवण्यासाठी अर्वाच्च भाषेचा वापरही केला.
या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि 'पॉक्सो' कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक अडागळे अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत