विश्वास व पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब! साई आदर्श मल्टीस्टेटने केला २०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विश्वास व पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब! साई आदर्श मल्टीस्टेटने केला २०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पार

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- अहिल्यानगर जिल्ह्यात विश्वास, पारदर्शकता आणि समाजाभिमुख सेवेमुळे विशेष ओळख असलेल्या राहूरी येथील साई आदर्श मल्टीस्टे...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

अहिल्यानगर जिल्ह्यात विश्वास, पारदर्शकता आणि समाजाभिमुख सेवेमुळे विशेष ओळख असलेल्या राहूरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि या संस्थेने नुकताच २०० कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय यशामुळे ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


संस्थेच्या या यशामागे संस्थापक व अध्यक्ष शिवाजीराव कपाळे (आप्पा) यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संचालक मंडळाचे सक्षम नियोजन, अधिकारी व कर्मचारी ,पिग्मी एजंट यांची समर्पित सेवा आणि सर्व ठेवीदारांनी दाखविलेला अढळ विश्वास हे प्रमुख घटक आहेत. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आर्थिक सेवा उपलब्ध करून

देण्याच्या ध्येयाने संस्थेने सातत्याने कार्य केले असून, त्याचाच परिपाक म्हणून २०० कोटी ठेवींचा मानाचा टप्पा गाठता आला आहे.कर्जवाटप १५२ कोटींचे असून एकूण वेव्हसाय ३५२ कोटींचा झाला आहे.त्यात सोनेतारण व ठेव तारण १२२ कोटींचे आहे.गुंतवणूक ४८कोटींची आहे.आजच्या स्पर्धात्मक आर्थिक वातावरणात कोणत्याही सहकारी संस्थेसाठी लोकांचा विश्वास टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असते.

     साई आदर्श मल्टीस्टेटने पारदर्शक कारभार, शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. २०० कोटी ठेवींचा हा टप्पा म्हणजे केवळ आर्थिक यश नसून, सहकाराच्या मूल्यांवर उभारलेल्या एका संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची आणि लोकविश्वासाची साक्ष आहे. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संस्था आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


प्रत्येक यशामागे असतो एक विश्वास... प्रत्येक प्रगतीमागे असते साथ... आणि प्रत्येक मोठ्या टप्प्यामागे असतात असंख्य माणसांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य.

    साई आदर्श मल्टीस्टेट आज २०० कोटी ठेवींचा सुवर्ण टप्पा पार करत असताना, हा केवळ आर्थिक आकडा नाही; तर आपल्या सर्वांच्या विश्वासाने घडवलेला अभिमानाचा क्षण

      या यशस्वी वाटचालीत श्री साईबाबांचे आशीर्वाद, सभासदांचा अढळ विश्वास, ठेवीदारांचे प्रेम, हितचिंतकांचे सहकार्य आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे समर्पित योगदान हेच आमच्या यशाचे खरे बळ ठरले आहे.

   संस्थेच्या ठेवी, शाखा आणि खातेदारांचा परिवार सातत्याने वाढत असताना, अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्याची आमची जबाबदारीही अधिक वाढली आहे.

  २०० कोटींचा हा टप्पा म्हणजे प्रवासाचा शेवट नाही... तर अधिक मोठ्या स्वप्नांची आणि नव्या ध्येयांची सुरुवात आहे.

आजवर आपण दिलेल्या विश्वास, प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक ऋणी आहोत. यापुढेही आपल्या विश्वासाला पात्र ठरत, सेवाभाव आणि प्रामाणिकतेसह आम्ही आपल्या सेवेत निरंतर तत्पर राहू.

         शिवाजीराव कपाळे 

          संस्थापक-साई   आदर्शमल्टीस्टेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत