संस्कृतीचा जागर; गणेगावच्या वाणी शैक्षणिक संकुलचा भव्य पायी दिंडी सोहळा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संस्कृतीचा जागर; गणेगावच्या वाणी शैक्षणिक संकुलचा भव्य पायी दिंडी सोहळा उत्साहात

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था संचलित श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल, अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

 गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था संचलित श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल, अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सरस्वती कॉलेज ऑफ फार्मसी आणि वाणी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पायी दिंडी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ताहाराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, राहुरी फॅक्टरी या मार्गावर दिंडी काढण्यात आली.

दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. लेझीम, झांज पथक, भक्तीपर नाट्य सादरीकरण तसेच विविध सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साही सहभागामुळे दिंडी सोहळ्याला विशेष रंगत आली.


या कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सोनिया जोसेफ, वाणी कॉलेजचे प्राचार्य सुरज घोलप, डॉ. थोरात, अजिंक्य इन्स्टिट्यूटचे वडीतके सर तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, बिट हवालदार तुळशीदास गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राहुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून मोलाचे सहकार्य केले.


यावेळी साई आदर्श पतसंस्थेचे शिवाजीराव कपाळे, दि राहुरी अर्बनचे रामभाऊ काळे, सर्जेराव शेटे, कदम साहेब तसेच ओंकार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा रवींद्र वामन हे सहकुटुंब उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त दाद दिली.


समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक दत्तात्रय वाणी यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भविष्यातही अशाच दर्जेदार, संस्कारक्षम आणि शिस्तप्रिय उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत