अहिल्यानगर (वेबटीम) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रदीप ...
अहिल्यानगर (वेबटीम)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू आणि विशेष मुलांसोबत साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांच्या पुढाकारातून मतिमंद मुलांच्या निवासी विद्यार्थी वस्तीगृहात प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रदीप मकासरे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन वाढून त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत केले. समाजातील वंचित, गरजू आणि विशेष मुलांप्रती संवेदनशीलता जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता समाजोपयोगी कार्यातून साजरा व्हावा, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि वस्तीगृहातील कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ मकासरे यांच्या सामाजिक जाणिवेचे आणि सेवाभावी कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम अशा उपक्रमांमुळे होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शहराध्यक्ष हरिश आल्हाट, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, संघटक दिनेश पंडित, वांबोरी शहराध्यक्ष आकाश मकासरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत