वारकऱ्यांची मोफत आरोग्यसेवा; देवळाली प्रवरातील 'या' डॉक्टरांचा स्तुत्य उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वारकऱ्यांची मोफत आरोग्यसेवा; देवळाली प्रवरातील 'या' डॉक्टरांचा स्तुत्य उपक्रम

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांसाठी देवळाली प्रवरा येथे मोफत आरोग्य से...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)



पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांसाठी देवळाली प्रवरा येथे मोफत आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टर प्रवीण कोठुळे आणि डॉक्टर नितीन नेहे यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले.



या उपक्रमाचा लाभ संतकवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळा तसेच त्र्यंबकराज स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसह इतर भाविक वारकऱ्यांनी घेतला. प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर तत्काळ उपचार करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

यावेळी राजेंद्र साळवे यांच्या वतीने वारकऱ्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत