अहिल्यानगर प्रतिनिधी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करत...
अहिल्यानगर प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करत मानव अधिकार संरक्षण समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला व विद्यार्थ्याला शांततापूर्ण मार्गाने आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह व लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लिंबाजी लोभाजी इंगावले, अहिल्यानगर जिल्हा संघटक भिकचंद पुंजाजी वरघुडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जयवंत गडाख, जिल्हा उप जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब काशिनाथ भालेकर, श्रीगोंदा तालुका निरीक्षक राजेंद्र रतन परदेशी, अहिल्यानगर जिल्हा मुख्य सल्लागार जालिंदर गेनूजी मुसमाडे, अहिल्यानगर शहराध्यक्ष महेश सर्जेराव देशमुख आणि अहिल्यानगर जिल्हा खजिनदार किरण भिकचंद वरघुडे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन शासनाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत