संत गाडगेबाबा विचार आत्मसात केल्यास जनसामान्यांची सेवा घडते - पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत गाडगेबाबा विचार आत्मसात केल्यास जनसामान्यांची सेवा घडते - पाटील

  वळण (वार्ताहर)  संत गाडगेबाबा यांनी जनसामान्यांसाठी आयुष्य पणाला लावले शिक्षणाची महती त्यांनी त्यावेळी सांगितली स्वच्छता,भुकेलेला अन्न, ज्...

 वळण (वार्ताहर)



 संत गाडगेबाबा यांनी जनसामान्यांसाठी आयुष्य पणाला लावले शिक्षणाची महती त्यांनी त्यावेळी सांगितली स्वच्छता,भुकेलेला अन्न, ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र असं अभियान त्यांनी त्यावेळी चालवलं आणि आज त्याच विचाराने आपण जर चाललो तरी खरी जनसेवा घडेल. त्यासारख पुण्य कुठचं मिळणार नाही.

असं मत वळण (ता. राहुरी) संत गाडगेबाबा आश्रमातील अशोकराव पाटील यांनी पानेगांव येथील रहिवासी व एसटी महामंडळात श्रीरामपूर येथे कार्यरत सुनिल भवार यांचा मातोश्री  साखरबाई यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व एक पेड माॅ के नाम वृक्षारोपण करण्यात आले.



त्यावेळी मागदर्शन करताना पाटील बोलत होते.भवार यांनी सलग तीन वेळा त्यांच्या आईच्या पुण्यस्मरण निमित्ताने हा स्नेहभोजनाचा उपक्रम जवळपास आश्रमात राबवित असून निश्चितच अभिमान वाटतो. भवार यांचा आदर्श दानशूरांनी घेवून संत गाडगेबाबा विचार आत्मसात केल्यास जनसामान्यांची सेवा घडेल आणि पुण्यरुपी आशिर्वाद मिळेल पाटील यांनी सांगितले.

सुनिल भवार यांनी आपल्या भाषणात सांगितले कि मी राहुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमाचा विद्यार्थी असून तेथे सहा वर्षे शिक्षण घेतले. गाडगेबाबा मुळेच मी घडलो माझं कुटुंब घडलं म्हणून माझ्या आईचं पुण्यस्मरण दिनानिमित्त सलग तीन वर्षे पासून पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संत गाडगेबाबा आश्रमात राबवित आहे.जो पर्यंत शक्य होईल तो पर्यंत हा पुण्यस्मरण निमित्ताने उपक्रम सुरु ठेवण्याचा संकल्प भवार यांनी केला. 

कार्यक्रमासाठी पानेगांवचे माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे, प्राचार्य बी, वाय वाघ, राजेंद्र नवगिरे, सोपान जंगले, गोवर्धन माळी, प्रविण भामरे,गोपाळ पाटील,शितल पाटील कविता सपकाळ, जालिंदर जंगले,नामदेव पवार,विशाल भवार,पंकज आरंगळे, नामदेव शेलार,आदीनाथ जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, प्रदिप जंगले,तानाजी घोलप, अनिल चिंधे, आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर सह शिक्षकवृंद उपस्थित होते.प्रास्ताविक संजय पवार यांनी केले सुत्रसंचलन मुख्याध्यापक मंगेश पगारे .आभार दत्तात्रय बर्डे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत