गुहा(प्रतिनिधी) श्रीसाईबाबा पालखी सोहळा समिती, गुहा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त गुहा ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी ...
गुहा(प्रतिनिधी)
श्रीसाईबाबा पालखी सोहळा समिती, गुहा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त गुहा ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा पालखी सोहळा १३ व्या वर्षात प्रवेश करत असून, बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजता कानिफनाथ मंदिर, गुहा येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे.
पालखी सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता कानिफनाथ मंदिरात पूजनाने होईल. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता श्रीसाईबाबांच्या पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ केला जाईल. पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरती, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था स्थानिक भाविक आणि सेवाभावी व्यक्तींनी केली आहे.
दुपारनंतर पालखी शिर्डीत दाखल होणार असून, खंडोबा मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता पालखी विश्रांती घेईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री साईबाबा समाधी मंदिराकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे.
पालखी समितीने साईभक्तांना शिस्तीचे पालन करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच महिलांनी सोबत छत्री किंवा रेनकोट आणावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे. शिर्डीहून परतीच्या प्रवासाची व्यवस्था पालखी समितीतर्फे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत