देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथे श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज दिंडी सोहळ्याची सांगतनिमित्त भव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथे श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज दिंडी सोहळ्याची सांगतनिमित्त भव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. अरुण महाराज उंबरकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.व त्यांनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कीर्तन सेवा गुरुपौर्णिमा बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.
श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज दिंडी सोहळा समिती, देवळाली प्रवरा यांच्या वतीने सर्व वारकरी, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत