श्री त्र्यंबकराज स्वामींची पायी दिंडी सोहळ्याची सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री त्र्यंबकराज स्वामींची पायी दिंडी सोहळ्याची सांगता

देवळाली प्रवरा (वेबटीम) श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते तीर्थक्षेत्र पंढरपूर असा आयोजित करण्यात आलेल्या श्री त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सो...

देवळाली प्रवरा (वेबटीम)



श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते तीर्थक्षेत्र पंढरपूर असा आयोजित करण्यात आलेल्या श्री त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचा सांगता कार्यक्रम गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत देवळाली प्रवरा येथे होणार आहे.

या कार्यक्रमात ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज नेवासकर यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सहारा लॉन्स, श्रीरामपूर रस्ता, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. नियोजन श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था तथा धर्म संस्कार केंद्र, रोजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी सौ. शिलाताई व श्री. सोन्याबापू दत्तात्रय जाधव, देवळाली प्रवरा यांचे संतपूजन राहणार आहे.

श्री त्र्यंबकराज स्वामींच्या भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या दिंडी सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत