श्रीरामपूर(वेबटीम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य सा...
श्रीरामपूर(वेबटीम)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२० श्रीरामपूर (अ. जा) विधानसभा मतदारसंघात आज "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर दि. १ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता शुभम सांस्कृतिक भवन, दत्तनगर, श्रीरामपूर येथे होणार आहे.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून आ. हेमंत ओगले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
शिबिराला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. सत्यजित तांबे, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, सातबारा, फेरफार, नावे दुरुस्ती, ई-पीक पाहणी यासह विविध महसूल सेवा येथे तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.
शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देणे आणि त्या थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. शिवराज्याच्या संकल्पनेप्रमाणे "जनतेच्या दारी शासन" ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न आहे असे मत प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत