राहुरी फॅक्टरीत प्रसादनगर येथे उद्या शनिवार व रविवारी मतदार यादी पडताळणीसाठी विशेष शिबिराचे (SIR)चे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत प्रसादनगर येथे उद्या शनिवार व रविवारी मतदार यादी पडताळणीसाठी विशेष शिबिराचे (SIR)चे आयोजन

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ मधील पात्र मतदारांसाठी मतदार यादी पडताळणी शिबिर (SIR-2026) चे आयोजन करण्यात...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ मधील पात्र मतदारांसाठी मतदार यादी पडताळणी शिबिर (SIR-2026) चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मतदारांना नाव मतदार यादीत असल्याची पडताळणी, SIR फॉर्म भरण्यास मदत, आवश्यक कागदपत्रांची तपासणी तसेच सन २००२ च्या मतदार यादीतील आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव शोधण्यासाठी BLO मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर १८ व १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हनुमान मंदिर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, राहुरी फॅक्टरी,  येथे आयोजित करण्यात आले आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक प्रकाश मार्शल संसारे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरास प्रभागातील सर्व पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मतदार यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत