राहुरी(वेबटीम) स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील ओ इलेक्ट्रॉनिक्स कडून ग्राहकांसाठी ‘स्वस्तात 7 दिवस’ या विशेष खरेदी महोत्सवाच...
राहुरी(वेबटीम)
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील ओ इलेक्ट्रॉनिक्स कडून ग्राहकांसाठी ‘स्वस्तात 7 दिवस’ या विशेष खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत ग्राहकांना मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन, होम थिएटर, इंडक्शन स्टोव्ह, इलेक्ट्रिक केटल यांसह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
या विशेष ऑफरमध्ये फायनान्सवर झिरो डाउन पेमेंट आणि ० टक्के व्याजदराच्या EMIची सुविधा देण्यात आली आहे. तसेच फायनान्सवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹५,००० पर्यंत कॅशबॅक मिळणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक खरेदीदाराला ब्रँडेड गिफ्ट, तर क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच निवडक LED TV वर ३ वर्षांपर्यंत वॉरंटीची सुविधा उपलब्ध आहे.
या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे Bajaj Finserv Mega Lucky Draw. ₹४,९९९ किंवा त्यापुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन मिळणार असून २१ ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
या लकी ड्रॉमध्ये रेफ्रिजरेटर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, होम थिएटर, इंडक्शन स्टोव्ह, इस्त्री आणि इलेक्ट्रिक केटल अशा विविध बक्षिसांचा समावेश आहे.
ग्राहकांनी या सात दिवसांच्या विशेष खरेदी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात आले आहे. ओ इलेक्ट्रॉनिक्सची शाखा नगर-मनमाड महामार्ग, राहुरी फॅक्टरी तसेच राहुरी पोस्ट ऑफिसजवळ येथे आहे.
अधिक माहितीसाठी ९५११००७८७८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत