देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा (ता-राहुरी) येथील 'अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान'च्या अध्यक्षपदी अनंत जग...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा (ता-राहुरी) येथील 'अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान'च्या अध्यक्षपदी अनंत जगन्नाथ शेळके यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. भास्कर चंद्रकांत कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रतिष्ठानच्या कार्यवाहपदी प्रा. गणेश सोपान भांड आणि कोषाध्यक्षपदी रवींद्र रंभाजी कराळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
प्रतिष्ठानच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडलेल्या कार्यकारी मंडळाच्या पहिल्या मासिक बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल देशपांडे यांनी काम पाहिले.
या बैठकीला जिल्हा संघचालक किशोर आण्णा निर्मळ आणि जिल्हा कार्यवाह प्रा. दीपक जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी जगदीश कदम पाटील, विनायक ढूस, किरण सूर्यवंशी, देवदत्त तांबे आणि अनुराधाताई भुजाडी यांचीही बिनविरोध निवड झाली. हे सर्व नवनिर्वाचित सदस्य या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत