अहिल्यानगर पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी स्वातंत्र्य दिनी ३० अधिकारी , अंमलदारांचा राष्ट्रपती सेवा पदक,अतिउत्कृष्ट सेवा पदक,दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक व सन्मानपत्र देऊन केले सन्मानित. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहिल्यानगर पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी स्वातंत्र्य दिनी ३० अधिकारी , अंमलदारांचा राष्ट्रपती सेवा पदक,अतिउत्कृष्ट सेवा पदक,दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक व सन्मानपत्र देऊन केले सन्मानित.

  अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) २५वर्षे सेवा कालावधीकरीता दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक  व १५ वर्षे सेवा कालावधीकरीता उत्कृष्ट सेवा पदक असे...

 अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी)



२५वर्षे सेवा कालावधीकरीता दीर्घकालीन अतिउत्कृष्ट सेवा पदक  व १५ वर्षे सेवा कालावधीकरीता उत्कृष्ट सेवा पदक असे तीन प्रकारचे पदक भारत सरकार यांचेकडून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदक प्रदान करण्यात आले 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे १५ ऑगस्ट  सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या  शुभहस्ते जिल्हा पोलीस दलातील३० पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रदान करण्यात आले. 

या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,नगर शहर पोलीस उपअधीक्षक डाॅ.दिलीप टिपरसे नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आदी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच सेवा पदक अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन  यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानीत करण्यात आलेले पुढीलप्रमाणे सपोनि हेमंतकुमार थोरात,पोलीस उपनिरीक्षक संपतराव खैरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश उपासने पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ,  पोलीस उपनिरीक्षक संजय खंडागळे,पोलीससहायक पोलीस उपनिरीक्षक विजय  लोंढे,पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण शेलुकर,

पोलीस हवालदार सचिन पवार, पोलीस हवालदार रेहान शेख पोलीस हवालदार कृष्णा कुऱ्हे,पोलीस हवालदार दिगंबर कारखिले,पोलीस हवालदार रंगानाथ नरसाळे, पोलीस हवालदार मल्लिकार्जुन बनकर, पोलीस हवालदार कृष्णा विधाटे, पोलीस हवालदार राजु सुद्रिक पोलीस हवालदार संदिप  पवार, पोलीस हवालदार संतोष ओव्हळ, पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस हवालदार दिपक घाटकर, पोलीस हवालदार अभिजीत अरकल,पोलीस हवालदार सुयोग सुपेकर,पोलीस हवालदार सुरेश माळी,पोलीस हवालदार माधुरी तोडमल ,पोलीस हवालदार किर्ती कांजवणे , पोलीस हवालदार भाग्यश्री  भिटे , पोलीस हवालदार,राहुल सोळुंके, पोलीस हवालदार अमोल घुले, यांना  प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

वरील अधिकारी अंमलदारांचे जिल्हा भरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत