राहुरीत १९ ऑगस्टला मेगा रक्तदान शिबिर’ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत १९ ऑगस्टला मेगा रक्तदान शिबिर’

  राहुरी (वेबटीम) राहुरी मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘मेगा ब्लड डोनेशन कॅम्प २०२६’ या रक्तदान शिबिराचे आय...

 राहुरी (वेबटीम)



राहुरी मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘मेगा ब्लड डोनेशन कॅम्प २०२६’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर विठ्ठल लॉन्स, राहुरी येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

मी रक्तदान करणारच!’, ‘रक्तदान करा, जीवदान द्या’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाला अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, राहुरी तसेच इतर सहकारी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राहुरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत