राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आता पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आता पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त

राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावताना आपल्या दमदार कार्यशैलीने आणि शिस्तबद्ध कारभाराने ठसा उमटविणारे तत...

राहुरी(वेबटीम)



राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावताना आपल्या दमदार कार्यशैलीने आणि शिस्तबद्ध कारभाराने ठसा उमटविणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची पदोन्नती होऊन पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलीस दलासह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धनंजय जाधव यांचा कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून नावलौकिक आहे. पंढरपूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. राहुरीत कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच अवैध व्यवसायांवर कारवाई, वाहतूक शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था याकडे विशेष लक्ष दिले.

राहुरी परिसरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे कारवाई करत पोलीस प्रशासनाचा वचक निर्माण केला. त्यांच्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांवर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या कार्यशैलीची विशेष चर्चा झाली होती.

राहुरीनंतर त्यांनी नेवासा पोलीस ठाणे तसेच अहिल्यानगर येथील विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी तपासकौशल्य, प्रशासनातील शिस्त आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.

दरम्यान, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पोलीस उपअधीक्षक (DySP) तथा सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीनंतर त्यांनी सुमारे दोन महिने गडचिरोली येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

यानंतर मंगळवारी झालेल्या नियुक्ती आदेशानुसार धनंजय जाधव यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोठ्या आणि महत्त्वाच्या पोलीस आयुक्तालयात मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल मानली जात आहे.

राहुरीत पोलीस निरीक्षक म्हणून केलेल्या कामाची आठवण आजही नागरिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जाते. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि गुन्हेगारीविरोधातील कठोर भूमिका यामुळे त्यांनी निर्माण केलेला पोलीस प्रशासनाचा वचक त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

धनंजय जाधव यांच्या पदोन्नतीनंतरच्या नव्या जबाबदारीबद्दल राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, पिंपरी-चिंचवड येथील नव्या जबाबदारीतही ते दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत