राहुरी फॅक्टरीत ईद-ए-मिलाद मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे,आयोजकांसह चालक-मालकाविरुद्ध गुन्हा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत ईद-ए-मिलाद मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे,आयोजकांसह चालक-मालकाविरुद्ध गुन्हा

राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरात ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरात ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी मिरवणुकीच्या आयोजकांसह डीजे चालक व मालकाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट रोजी प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक व ध्वनीप्रदूषणाबाबत घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबत आयोजक व उपस्थित नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रसादनगर राहुरी फॅक्टरी ते राहुरी फॅक्टरी बसस्थानक या मार्गावर मिरवणुकीसाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज केला होता.


बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी प्रसादनगर येथे गेले असता मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही कर्णकर्कश आवाजात डीजे सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या आवाजात घोषणाबाजीही करण्यात आल्याचे नमूद आहे.


मिरवणुकीदरम्यान नगर-मनमाड महामार्गावरही मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.


या प्रकरणी पोलिस कर्मचारी अमोल परशुराम भांड (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरवणुकीचे आयोजक आसिफ नईम शेख, आख्तर लाला शेख, इम्रान अन्सार सय्यद, सलमान मसीउल खान आणि सरफराज तैनुरअली पठाण, तसेच डीजे चालक व मालक महेश दत्तात्रय कोबरणे (वय ३२, रा. गणेगाव, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादीत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ३ व १५ अन्वये कारवाई करण्यात आल्याचे नमूद आहे.


या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत