राहुरी(वेबटीम) तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहराबाद येथे पिंपळदरा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू पिंपळेश्वर महादेव शिवपंचायत तीर्थक्षेत्रात...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहराबाद येथे पिंपळदरा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू पिंपळेश्वर महादेव शिवपंचायत तीर्थक्षेत्रात तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ३१ ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे चारशे वर्षांपासून स्वयंभू महादेवाचे स्थान असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत कवी महिपती महाराजांचे गुरुस्थान म्हणूनही या पवित्र भूमीची विशेष ओळख आहे.
तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त सकाळी ८ वाजल्यापासून अभिषेक, महायज्ञ व आरतीचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाप्रसादाचे अन्नदाते किरण शिंदे, आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र शासन आहेत.
पिंपळेश्वर महादेव देवस्थान समिती व समस्त ग्रामस्थ, श्रीक्षेत्र ताहराबाद यांच्या वतीने सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान स्वयंभू पिंपळेश्वर महादेवाचे दर्शन घ्यावे तसेच अभिषेक, आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📍 स्थळ : स्वयंभू पिंपळेश्वर महादेव शिवपंचायत तीर्थक्षेत्र, श्रीक्षेत्र ताहराबाद, पिंपळदरा घाटाच्या पायथ्याशी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत