पानेगांव (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे माझे गांव आरोग्य संपन्न गांव बैठक अंगणवाडी येथे पार पडली सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे माझे गांव आरोग्य संपन्न गांव बैठक अंगणवाडी येथे पार पडली सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत करजगांव समुदाय डॉ. प्रज्ञा आव्हाड यांनी यावेळी महिलांच्या आरोग्यावर माहिती देवून डेंग्यू आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान बरोबरचं ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण कंपोस्ट खत निर्मिती आदी विषयांवर माहिती देण्यात आली.यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले/आंबेकर उपसरपंच सुरेश जंगले ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे , आरोग्य सेवक आप्पासाहेब गडाख,आरोग्य सेविका बळवंते मॅडम आशासेविका विमल वाघमारे, अंगणवाडी सेविका मंगल गुडधे,गोदाबाई चिंधे, सुनिल चिंधे बाबासाहेब शेंडगे फ्रांन्सिंस वाघमारे आदींसह आरोग्य समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
करजगांव अंतर्गत आरोग्य विभागाचं काम व्यवस्थितपणे पार पडत असून ग्रामपंचायत येथे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून आठवडाभरातुन एकदा आरोग्य कर्मचारी यांनी उपस्थित राहण्यासाठी मागणी उपसरपंच सुरेश जंगले यांनी केली असता आरोग्य सेवक आप्पासाहेब गडाख उपस्थित राहणार असल्याचे आरोग्य समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत