राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी आनंद भारतराव गुंजाळ यांची एकमताने निवड कर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी आनंद भारतराव गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ही निवड सोसायटीचे मार्गदर्शक तथा खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव केशवराव हारदे, कारखान्याचे माजी संचालक विजयकुमार डौले, सोसायटीचे माजी चेअरमन मारुतराव हारदे तसेच माजी संचालक नानासाहेब भुजाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रकाश नानासाहेब भुजाडी, व्हाईस चेअरमन प्रदीप भुजाडी, संचालक प्रशांत डॉले, डॉ. रखमाजी घाडगे, राजेंद्र काळे, संदीप भोंगळ, बाबासाहेब गुंजाळ, संजय येवले, डॉ. सचिन हारदे, संचालिका पुष्पाताई भुजाडी, भगवान राजगुरू, दत्तात्रय तागड, राजेंद्र एकनाथ भोंगळ, आदिनाथ गुंजाळ यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
श्री. आनंद गुंजाळ यांच्या निवडीबद्दल राहुरी तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अरुण तनपुरे तसेच देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर राहुरी फॅक्टरी, गुंजाळ मळा तसेच पंचक्रोशीतील मित्रपरिवार, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद गुंजाळ यांचा सत्कार करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत