राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव गणपत पवार यांचे आज, शुक्रवार दि. ४ सप्...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव गणपत पवार यांचे आज, शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते स्वरगंगा वाद्यवृंदाचे एकनाथ व गोरख पवार यांचे वडील होत.
त्यांच्यावर आज रात्री १० वाजता प्रसादनगर येथील निर्मल कृष्ण अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत