देवळाली प्रवरा येथे आज रंगणार दहीहंडी उत्सव, विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे आज रंगणार दहीहंडी उत्सव, विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस

देवळाली प्रवरा : प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धर्म योद्धा ग्रुपच्या वतीने आज रविवार, ६ सप्टेंबर रोजी देवळाली प्रवरा येथील बाजार तळा...

देवळाली प्रवरा : प्रतिनिधी



श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धर्म योद्धा ग्रुपच्या वतीने आज रविवार, ६ सप्टेंबर रोजी देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.

उत्सवाच्या निमित्ताने बाजार तळ परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभारण्याचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे. गोविंदा पथकांच्या साहसी खेळामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

या दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गोविंदा पथकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध पथकांनी तयारी केली आहे.

“आनंद लुटा...! जय श्रीकृष्ण” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी सोहळ्यास देवळाली प्रवरा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्म योद्धा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत