दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड

राहुरी (वेबटीम) अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र विठ्ठ...

राहुरी (वेबटीम)



अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र विठ्ठल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


संस्थेच्या सभागृहात आज झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले.


यावेळी संस्थेचे संचालक प्रशांत रामचंद्र काळे, अनिल साहेबराव चव्हाण, गोरख उत्तम इंगळे, अमोल अशोक कल्हापुरे, सतीश बाबासाहेब औटी, प्रसाद कारभारी लोखंडे, कमल रामचंद्र काळे, नंदा आप्पासाहेब ढूस, योगेश सुभाष बोरुडे, मारुती शंकर मोरे आदी संचालक उपस्थित होते.


निवडीनंतर सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी सहाय्यक निबंधक खेडकर साहेब, नवनिर्वाचित चेअरमन रामचंद्र काळे व सर्व संचालक मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत