राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- लेखक वैभव ढुस लिखित ‘धर्म रक्षति रक्षित:’ या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या १० दिवसांत तब्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
लेखक वैभव ढुस लिखित ‘धर्म रक्षति रक्षित:’ या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या १० दिवसांत तब्बल ७ हजार प्रतींची विक्रमी बुकिंग झाली आहे. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच झालेल्या या विक्रमी बुकिंगमुळे साहित्य क्षेत्रात या पुस्तकाची मोठी चर्चा रंगली आहे.
धर्म, संस्कृती, विचार आणि सामाजिक वास्तवाशी संबंधित विषय मांडणाऱ्या या पुस्तकाबद्दल वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पुस्तकाची माहिती आणि आशय वाचकांपर्यंत पोहोचताच अनेकांनी पुस्तकाची आगाऊ नोंदणी करण्यास सुरुवात केली.
अल्पावधीत ७ हजार प्रतींची बुकिंग होणे हा लेखक वैभव ढुस यांच्या लेखनाला मिळालेला महत्त्वपूर्ण प्रतिसाद मानला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत