हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; २०१७ नंतर दुर्मिळ योग, हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; २०१७ नंतर दुर्मिळ योग, हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी

सोमवार १४ सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. २०१७ नंतर असा योग दुर्मिळ मानला जात आहे. पंच...

सोमवार १४ सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. २०१७ नंतर असा योग दुर्मिळ मानला जात आहे. पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होऊन त्यानंतर चतुर्थी सुरू होणार आहे.



हरतालिका व्रतासाठी सूर्योदयाला तृतीया तिथी असणे आवश्यक असते, तर गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी मध्यान्हकाळात असणे महत्त्वाचे मानले जाते. १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि मध्यान्हकाळात चतुर्थी असल्यामुळे दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत.

तिथीचे सूर्योदय किंवा मध्यान्हकाळाशी असलेले संबंध हे व्रताच्या दिननिश्चितीसाठीचे नियम आहेत. संबंधित तिथीच्या याच वेळेत पूजा करणे बंधनकारक आहे, असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे सकाळी ७.०७ वाजता तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा त्यानंतरही हरतालिका पूजन करता येईल. तसेच सकाळी ७.०७ वाजण्यापूर्वीदेखील पार्थिव गणेशाची पूजा करता येऊ शकते.

सूर्योदयापासून मध्यान्हकाळाच्या समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य कालावधी मानला जात असल्याने आणि दोन्ही व्रतांचे कर्ते वेगवेगळे असल्याने हरतालिका पूजन आणि गणेश पूजन यापैकी कोणतीही पूजा आधी किंवा नंतर करता येऊ शकते, असे श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालयाचे श्री. दिनेश विजय जोशी (गुरु) यांनी स्पष्ट केले आहे.

संपर्क : ८०५५४२४२१९ / ९०९६२२१६३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत