शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक; देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

देवळाली प्रवरा (वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुल हरिभाऊ महांकाळ यांच्या शेतातील चार एकर ऊस वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळू...

देवळाली प्रवरा (वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुल हरिभाऊ महांकाळ यांच्या शेतातील चार एकर ऊस वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. या आगीत महांकाळ यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

देवळाली प्रवरा येथील गट नंबर १५५१/६ मध्ये राहुल महांकाळ यांची शेती आहे. शेतातून गेलेल्या वीजवाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ऊस पिकाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने जवळपास चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऊस पिक कोरडे असल्याने आग वेगाने पसरली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत