राहुरी तालुका शासकीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेत 92 मुला-मुलींच्या संघांचा सहभाग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुका शासकीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेत 92 मुला-मुलींच्या संघांचा सहभाग

देवळाली प्रवरा(वेबटीम)  अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व राहुरी तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी माध्यमि...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



 अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व राहुरी तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे राहुरी तालुका शासकीय पावसाळी खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 28 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील 92 मुला-मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त  जयंतजी वाघ  व ज्येष्ठ विश्वस्त दीपक दरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.


यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मकरंद रायते , राहुरी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, कार्याध्यक्ष गणेश म्हसे, सचिव  अभयसिंग पाटील,  दत्तात्रय कडू, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन रणधीर, रवींद्र ढूस, अशोक कदम, बाबासाहेब जाधव सर, श्री. बर्डे सर, श्री. धनु करपे सर, श्री. यश सरोदे, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनीता दिघे , पर्यवेक्षक डोफे सर, साबळे सर व श्री. विलास पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.


विद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवस अतिशय उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात खो-खोचे सामने पार पडले. विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली. खेळाडू, क्रीडा शिक्षक व पंच यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साहात पार पडली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभागाचे प्रा. गणेश भांड यांनी केले, तर  राजेंद्र कुळधरण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत