मुळा नदीवरील बंधारे भरण्यासाठी उद्या पाणी सोडणार,जलसंपदा मंत्र्यांचे पाटबंधारे विभागाला आदेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा नदीवरील बंधारे भरण्यासाठी उद्या पाणी सोडणार,जलसंपदा मंत्र्यांचे पाटबंधारे विभागाला आदेश

राहुरी(वेबटीम)  तालुक्यात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा नदीवरील बंधारे भरून द...

राहुरी(वेबटीम)



 तालुक्यात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा नदीवरील बंधारे भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार उद्या सकाळी ९ वाजता मुळा नदीपात्रात ५०० दशलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणी सोडण्यात येणार आहे.


या पाण्यामुळे मुळा नदीवरील डिग्रस, मानोरी, मांजरी आणि वांजुळपोई यासह परिसरातील बंधारे भरून देण्यात येणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत विखे पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासोबतच गोधनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बंधारे भरण्याचे आश्वासन दिले होते.


त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून उद्या शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मुळा नदीवरील बंधारे भरल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, शेतकरी तसेच पशुधनाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत