मांजरीत मुळामाईची बालब्रह्मचारी सेंदौंरे महाराज यांच्या हस्ते जलपुजन. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मांजरीत मुळामाईची बालब्रह्मचारी सेंदौंरे महाराज यांच्या हस्ते जलपुजन.

पानेगांव (वार्ताहर) नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील जीवनदायनी म्हणून संबोधले जाणार्या मुळानदीला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण ...

पानेगांव (वार्ताहर)



नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील जीवनदायनी म्हणून संबोधले जाणार्या मुळानदीला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार मुळाधरणाच्या पाण्यातुन मुळानदीवरील चार हि बंधारे केटीवेअर पुर्ण क्षमतेने भरले असून मांजरी येथे दि. 4 रोजी सकाळी 9 वा.बालब्रह्मचारी प्रकाश महाराज सैंदोरे व मुळाथडी पाणी आरक्षण कृती समिती, शेतकरी, ग्रामस्थ स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले.यावेळी मांजरी ग्रामपंचायत उपसरपंच कोंडीराम विटनोर,भारत विटनोर,ग्रामपंचायत सदस्य तुषार विटनोर, गोरक्षनाथ विटनोर तुकाराम विटनोर, राऊसाहेब विटनोर, बाबासाहेब विटनोर, पांडुरंग जंगले,कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, उपाध्यक्ष भाऊसाहेब  विटनोर, कार्याध्यक्ष नानासाहेब जुंधारे, खजिनदार विलास सैंदोरे,संघटक किरण जाधव, सहसचिव विठ्ठल जाधव, सचिव बाळासाहेब नवगिरे, सदस्य किशन विटनोर, विजय जंगले,रामभाऊ जाधव, बाबासाहेब वाघमोडे, पाटीलबा बाचकर आदिनाथ विटनोर, आप्पासाहेब विटनोर, आंबादास विटनोर,अमोल विटनोर,दिलीप घोलप,अण्णासाहेब जुंधारे,अण्णासाहेब बिडगर,सुभाष विटनोर, हनुमंत भगत,आनंद विटनोर  आदीं सह मान्यवर उपस्थित होते.

 ऐन दुष्काळात मुळाधरणाच्या पाण्यातून मुळानदीवरील चारहि बंधारे पुर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदी वातावरण असून सलग 12 वर्षापासून बंधारे भरण्याची प्रकिया राबविण्यात येत असून हक्काचे कायमस्वरूपी पाणी बंधारे भरण्यासाठी आरक्षीत करण्यासाठी निर्णायक लढाई राबविण्यात येणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, विलास सैंदोरे, किरण जाधव यांनी सांगितले.

 मुळा नदीवरील चारही  डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजुळपोई  मुळाधरणाच्या पाण्याने भरून दिल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे,आमदार विठ्ठलराव लंघे पाटिल, आमदार अक्षय कर्डीले, आमदार प्राजक्त तनपुरे,हेमंत ओगले यांच्या हस्ते मांजरी बंधारा येथे विधिवत जलपूजन करुन भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येणार असल्याचे 

मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष नानासाहेब जुंधारे, किरण जाधव भारत विटनोर, तुषार विटनोर, यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत