मुळाधरणाचे पाणी बंधारे भरण्यासाठी केटीवेअरमध्ये दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळाधरणाचे पाणी बंधारे भरण्यासाठी केटीवेअरमध्ये दाखल

  पानेगांव(वेबटीम)  मुळाधरणाच्या पाण्यातुन नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील मुळानदीवरील चार केटीवेअर बंधारे पुर्ण क्षमतेने भरुन देण्यासाठी राज...

 पानेगांव(वेबटीम)



 मुळाधरणाच्या पाण्यातुन नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील मुळानदीवरील चार केटीवेअर बंधारे पुर्ण क्षमतेने भरुन देण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा, राहुरी येथे दुष्काळ दौरा आढावा बैठका वेळी सबंधित पाटबंधारे विभाग अभियंता यांना मुळाधरणाच्या पाण्यातुन मुळानदीवरील असणारे चार हि केटीवेअर पुर्ण क्षमतेने भरुन देण्याचे आदेश आठवडा भरा पुर्वी देण्यात आले होते. दि. 2 रोजी पाटबंधारे विभागाच्या वतीने सकाळी 9 वाजता 11 मोर्या मधून 2500 क्यूससने पाणी सोडण्यात आले असून नदीपातातील शेवटचा वांजूळपोई अंमळनेर बंधार्यात सायंकाळी 6 वाजता पाणी दाखल झाले. शेतीपिकाबरोबर

पशुधन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असलेल्या मुळाथडीतील गावांना धरणातून बंधारे भरून घेण्यासाठी मुळा नदीला पाणी सोडण्यात आल्याने लाभधारक गावांमध्ये फटाक्यांच्या आताषबाजीने मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव ल़ंघे पाटील , आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे या़चा नावाचा जल्लोष करण्यात आला चार बंधाऱ्यावर फळ्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, सायंकाळी  6 वा.अंमळनेर बंधाऱ्यात पाण्याचे आगमन झाले 

मागच्या उन्हाळ्यात प्रवरा नदीवरील बंधारे भरून देण्यात आल्यानंतर मुळा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी मुळाथडी पाणी आरक्षण कृती समिती, शेतकरी, लोकनेते सुनिल गडाख यांनी बंधारे भरण्याची मागणी संबंधित पाटबंधारे विभागाला केली अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठल लंघे, आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार अक्षय कर्डिले हे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर बंधारे भरत असल्याने नेवासा तसेच राहुरी तालुक्यातील मुळाथडी परीसराती़ल डिग्रस, आरडगाव, मानोरी,वळण, पिंप्रि,शिरेगांव, खेडलेपरमानंद, पानेगांव, मांजरी करजगा़व, अमळनेर आनंद व्यक्त केला आहे.

  धरणाच्या पाण्यातुन मुळानदीवरील चार हि बंधारे भरत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुष्काळात मिळालेला असून मुळाथडी आरक्षण कृती समितीचा वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांचे कृती समितीच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त करण्यात येत आहे - नानासाहेब जुंधारे.

 दुष्काळ परिस्थिती मुळानदीवरील बंधारे भरल्याने शेतकरी आनंदी झाला असून मुळाधरणातुन पाणी सुटताच तोफांची सलामी ने निर्णय स्वागत करुन जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अक्षय कर्डीले आमदार प्राजक्त तनपुरे यांचा हस्ते करुन भव्य दिव्य सत्कार आयोजित करण्यात येईल 

किरण जाधव मा. सरपंच शिरेगांव, संचालक मुळाथडी आरक्षण कृती समिती 

दोन दिवसांत चारही बंधारे भरले जातील. याकरिता चाळीसहून अधिक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. दोन दिवसांत ५०० एमसीएफटी (अर्धा टीएमसी) पाणी धरणातून कमी होईल. 

- सायली पाटील, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत