शालेय कुस्तीत राहुरीच्या पै.तुषार कैलास रणसिंग ची राज्यपातळीवर चमकदार कामगिरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शालेय कुस्तीत राहुरीच्या पै.तुषार कैलास रणसिंग ची राज्यपातळीवर चमकदार कामगिरी

राहुरी प्रतिनिधी   राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पै. तुषार कैलास रणसिंग याने ७० व्या राज्यस्तरीय शालेय कु...

राहुरी प्रतिनिधी 



 राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पै. तुषार कैलास रणसिंग याने ७० व्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. ६५ किलो वजन गटात त्याने द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या कुस्ती कौशल्याची छाप राज्यपातळीवर उमटवली आहे.


पै. तुषारने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या महाविद्यालयासह राहुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण राहुरी तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पै. तुषार कैलास रणसिंग याने कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे सहकार्य आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.


पै. तुषारच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत