राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांना अहिल्यानगर येथे आयोजित संत साहित्य संमेलनात ‘संत पायिक पुरस्कार’ प्रदान करू...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांना अहिल्यानगर येथे आयोजित संत साहित्य संमेलनात ‘संत पायिक पुरस्कार’ प्रदान करून महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संत साहित्य व संत परंपरेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहिल्यानगर संचालित श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प यांच्या विद्यमाने ‘अहिल्यानगर जिल्ह्यातील संत साहित्य व परंपरा’ या विषयावर संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांना ‘संत पायिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी नवनाथ महाराज म्हस्के, संजय खेले, गजेंद्र गाडगीळ, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, स्वागताध्यक्ष सतीश तथा आबा मुळे, प्राचार्य सुनील पंडित, प्रा. मीरा पटारे, प्रा. भीमराज पटारे, डॉ. दिलीप धनेश्वर, दत्तात्रय भालेराव, डॉ. राजू रिक्कल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत