श्री.क्षेत्र ताहाराबाद येथे शारदीय नवरात्र निमित्ताने महिला कीर्तन महोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री.क्षेत्र ताहाराबाद येथे शारदीय नवरात्र निमित्ताने महिला कीर्तन महोत्सव

ताहाराबाद (वार्ताहर)  श्री संत कवी महिपती महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र ताहाराबाद येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्...

ताहाराबाद (वार्ताहर)



 श्री संत कवी महिपती महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र ताहाराबाद येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ‘महिला कीर्तन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा, रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने महोत्सवाचा प्रारंभ होणार असून मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

                     छत्रपती महाराणी ताराबाई आणि आईसाहेब सरस्वती महिपती यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा उपक्रम श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील महिला-पुरुष भाविक- भक्तांच्यावतीने संपन्न होत आहे. महोत्सवातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये अभिषेक, आरती, ग्रामप्रदक्षिणा, हरिपाठ, प्रवचन व कीर्तन महोत्सव आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे (पाठ) पारायण होणार आहे. "यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ॥" ह्या संतवचनाप्रमाणे सर्व महिला-पुरुष भाविकांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सीमाताई आहेर यांनी केले आहे.

                               आज रविवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सत्रात ७ ते ९  आरतीताई शिंदे श्रीरामपूर , सोमवार १२ ऑक्टोबर रोजी शालिनीताई देशमुख इंदोरीकर,मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी सुप्रियाताई  (साठे) ठाकूर पुणे, बुधवार १४ ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वरीताई  भोजदरे नाशिक, गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी गौरीताई सांगळे पंढरपूर,शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी रोहिणीताई परांजपे पुणे,शनिवार १७ ऑक्टोबर रोजी कावेरीताई घुमरे नाशिक,  रविवार १८ ऑक्टोबर रोजी राधाताई सानप बीड,सोमवार १९ ऑक्टोबर रोजी हर्षलताई  मगर, मुंबई तर मंगळवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२वा. सीमाताई आहेर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वा.भव्य ग्रंथ मिरवणूक व नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच सायं. ६ ते ७ ह्या वेळेत दीप प्रज्वलन कार्यक्रम होईल.

                महोत्सवात दुपारच्या सत्रात ४ ते ५ वा.श्रद्धाताई भोकरे, रेणुकाताई भुसे, वैष्णवी नरोडे, सोनालीताई गावडे, योगिताताई शेळके, कल्पनाताई कराड व गीताताई धसाळ आदींची प्रवचन सेवा होणार आहे. तरी ह्या ज्ञानयज्ञात सर्वांनी सहभागी होऊन ज्ञानामृताचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत