राहुरी फॅक्टरीत शिवतेज मित्र मंडळाचा शारदा उत्सव २०२६ , विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत शिवतेज मित्र मंडळाचा शारदा उत्सव २०२६ , विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील शिवतेज सामाजिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने शारदा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील शिवतेज सामाजिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने शारदा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांना विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.



उत्सवाची सुरुवात रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता देवी तुळजा भवानी मातेच्या घटस्थापनेने होणार आहे. यावेळी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात होईल. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता संगीत खुर्ची स्पर्धा, तर मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी एक मिनिट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून, गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भजन संध्या आणि त्यानंतर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी अंताक्षरी स्पर्धा रंगणार आहे. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा आणि होम मिनिस्टर अर्थात पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला आहे.



उत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी स्नेहमाला डान्स अकॅडमी प्रस्तुत ‘ठणका धमाका’ हा नृत्याविष्कार सादर होणार आहे. विविध वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता यावे, या उद्देशाने मंडळाने वेगवेगळ्या स्पर्धांचे नियोजन केले आहे.

होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना नगरसेवक राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे यांच्यावतीने आकर्षक भेट मिळणार असून, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होम हवन व खिचडी प्रसाद वाटप होणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दशहरा व विजयादशमीच्या सर्व स्पर्धांचा निकाल आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.


शिवतेज मित्र मंडळाचे प्रेरणास्थान व संस्थापक स्व. सुरेश मुरलीधर लोखंडे यांच्या स्मृती जपत, त्यांचे बंधू राजेंद्र मुरलीधर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवाराच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत