ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी तत्काळ पुढाकार घ्यावा; १० नोव्हेंबर अंतिम मुदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी तत्काळ पुढाकार घ्यावा; १० नोव्हेंबर अंतिम मुदत

  वांबोरी(वेबटीम) वांबोरी व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ई-पीक पाहणीबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शेतातील पिकांची ई-पीक पाहणी ...

 वांबोरी(वेबटीम)



वांबोरी व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ई-पीक पाहणीबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शेतातील पिकांची ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर २०२६ असून, या मुदतीपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तलाठी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.


विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तसेच ज्यांनी पीक विमा भरलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार मिळणाऱ्या पंचनामा आधारित नुकसानभरपाई किंवा अनुदानासाठी शेतातील पिकांची अधिकृत नोंद महत्त्वाची ठरू शकते.


यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये DCS MH ॲप्लिकेशन डाउनलोड करून स्वतः आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी करावी. ॲपमध्ये पिकांची माहिती भरून आवश्यक छायाचित्रांसह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.


मात्र, सध्या संबंधित ॲपमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने काही शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना अडथळे निर्माण होत आहेत. अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे.


१० नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी. कोणताही शेतकरी ई-पीक पाहणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी जागरूक राहून तलाठी कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन तलाठी भाऊसाहेब सुनील गीते यांच्याकडून करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत