राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. सन २००५-०६ च्या दहावी (SSC) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या रंगकामासाठी विकास निधी म्हणून ६० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
हा निधी राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे यांच्या हस्ते शाळा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत तिच्या विकासासाठी योगदान देण्याचा माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
याप्रसंगी राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे व गोविंद खवडे यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिरसाठ सर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री. शिरसाठ सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी दिलेल्या या आर्थिक योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत