राहुरी फॅक्टरीतील फातिमा माता चर्चचा यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील फातिमा माता चर्चचा यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी : राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या फातिमा माता चर्चचा वार्षिक यात्रा उत्सव शनिवार, दि. ३१ ऑक्टो...

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी :



राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या फातिमा माता चर्चचा वार्षिक यात्रा उत्सव शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील असंख्य भाविकांनी सहभागी होत प्रार्थना, प्रवचन आणि पवित्र मिस्सा बलिदानाचा लाभ घेतला.संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. २८ ऑक्टोबरपासून तीन दिवस विविध धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'प्रभू येशूची आईचे आदर्श जीवन' या विषयावर रेव्ह. फा. किशोर विघाते यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी 'पवित्र कुटुंब व माझे कुटुंब' या विषयावर रेव्ह. फा. पीटर डिसोझा यांनी मार्गदर्शन केले. तर शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी 'प्रभू येशू माझा तारणारा' या विषयावर रेव्ह. फा. विलास सोनवणे यांनी धार्मिक प्रवचनातून प्रभू येशूच्या शिकवणीचे महत्त्व विशद केले.


शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी यात्रेचा मुख्य धार्मिक सोहळा पार पडला. नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी बिशप बार्थोल बरेटो यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र मिस्सा बलिदानाचा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक प्रार्थनेत सहभागी होत फातिमा मातेचे दर्शन घेतले आणि धार्मिक विधींचा लाभ घेतला.


यात्रा सोहळ्यासाठी गुहा, रावका वस्ती, गुहा फाटा, प्रसादनगर, कणगर, ताहाराबाद, वडनेर, चिंचविहिरे, देवळाली प्रवरा, बिरोबावाडी, मकासरे वस्ती, लाख आदी परिसरांतील भाविकांचे विशेष सहकार्य लाभले. विविध गावांमधून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे यात्रेला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


यात्रा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत तसेच येशू मरिया सदनच्या सिस्टर सुपीरियर सिस्टर अर्चना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश केदारी, फकिरा कदम, संजय संसारे, गौतम ओहोळ, सुरेश बागुल, सुभाष संसारे, रविकिरण फुलपगार, भिकाजी ओहोळ गुरुजी, राजू साळवे, अतुल वंजारे, नेल्सन कदम, प्रकाश कसबे, शरद साळवे आदींसह यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत