डॉ. सतीश सोनवणे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते; फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ. सतीश सोनवणे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते; फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये!

  अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर येथील प्रसिद्ध कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून बनावट फेसबुक खा...

 अहिल्यानगर(वेबटीम)



अहिल्यानगर येथील प्रसिद्ध कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. या खात्यावरून नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत डॉ. सोनवणे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट फेसबुक खात्यावरून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अशा खात्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी सोशल मीडियावर अनोळखी किंवा संशयास्पद खात्यांपासून सावध राहावे आणि बनावट खाते आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत