राहुरी(वेबटीम) तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेस पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेस पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे यांच्या हस्ते आमदार सत्यजित तांबे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या भेटीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रातील वाटचाल, ग्रामीण भागातील आर्थिक
विकास, सामाजिक उपक्रम तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर मनमोकळी चर्चा झाली.
यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी प्रेरणा पतसंस्था व मल्टिस्टेटच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. सहकार क्षेत्रात काम करताना सभासदांचा विश्वास संपादन करणे, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणे आणि संस्थेच्या कामकाजात शिस्त राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रेरणा पतसंस्था व मल्टिस्टेटने या बाबींना प्राधान्य देत आपली विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. संस्थेचा शिस्तबद्ध कारभार आणि विश्वासार्हतेमुळे जिल्ह्यात नावलौकिक निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.
संस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची, कार्यपद्धतीची तसेच सभासदांना दिल्या जाणाऱ्या विविध आर्थिक सुविधांची माहिती आमदार तांबे यांना दिली. संस्थेने जपलेली विश्वासार्हता, सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सहकार क्षेत्रातील योगदान याबाबतही यावेळी चर्चा झाली.
यावेळी विष्णुपंत वरपे, अशोक उरहे, शरद वाबळे, दत्तात्रय शेळके, राजेंद्र बोरुडे, श्री. चंद्रे यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत