राहुरी फॅक्टरी(वेबटीम) श्रीविवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार व रुग्णालय पतसंस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांशाचे वाटप ट्रस्टच...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
श्रीविवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या धन्वंतरी कामगार व रुग्णालय पतसंस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांशाचे वाटप ट्रस्टचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन गजानन वराळे यांनी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. अरुण तनपुरे म्हणाले की, पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू सभासदांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्याची योग्य पद्धतीने वसुली करणे, तसेच पारदर्शक व नियोजनबद्ध कारभार राखणे यामुळे सभासदांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासाच्या बळावर संस्थेला ९ टक्के लाभांश देणे शक्य झाले आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत उपस्थितांना दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पतसंस्थेचे चेअरमन गजानन वराळे, व्हाइस चेअरमन विजय डुकरे, ज्येष्ठ संचालक डॉ. चेतना कुलकर्णी, डॉ. अनंतकुमार शेकोकार, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. निलेश जाधव, भगवानराव म्हसे, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय हिवाळे, ज्ञानेश्वर टिक्कल, सीताराम गाडे, सौ. शोभा ठुबे, विमलताई हुडे, सेक्रेटरी जी. डी. बोर्डे, आबासाहेब वाळुंज यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हाइस चेअरमन विजय डुकरे यांनी केले, तर ज्येष्ठ सभासद डॉ. कड यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत