केडगावला जगद्गुरु नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केडगावला जगद्गुरु नरेंद्राचार्यजींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

अहिल्यानगर  अंधश्रद्धा निर्मूलन, आध्यात्मिक जागृती आणि मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्रीमद्...

अहिल्यानगर 



अंधश्रद्धा निर्मूलन, आध्यात्मिक जागृती आणि मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन शनिवार व रविवार, २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगरमधील केडगाव येथील निशा लॉन्स, नगर-पुणे महामार्गावर, इंडस्ट्रियल एरियासमोर करण्यात आले आहे.
अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालत मानवी जीवनातील विविध समस्या आणि अडचणींवर मार्गदर्शन करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत सुखी, समाधानी व समृद्ध जीवन कसे जगावे, याबाबत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी मार्गदर्शन करणार आहेत.
या सोहळ्यात जीवन जगण्याची त्रिसूत्री मांडण्यात आली आहे. 'डोळे विज्ञानवादी ठेवा, मन आध्यात्मिक ठेवा आणि विचार व्यवहारवादी ठेवा' हा संदेश देत वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक विचार आणि व्यवहारज्ञान यांचा समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक समजून घेत समाजात विवेक, सदाचार, मानवता आणि सकारात्मक विचारांची रुजवण व्हावी, यासाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे.

जीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, आध्यात्मिक मार्गदर्शन मिळविण्यासाठी तसेच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम, उपपीठ उत्तर महाराष्ट्र, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत