उंबरे : प्रतिनिधी गावच्या विकासासाठी आणि येथील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची...
उंबरे : प्रतिनिधी
गावच्या विकासासाठी आणि येथील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा युवानेते आण्णासाहेब पाटील दुशिंग यांनी केली. दुशिंग म्हणाले, गावात आज अनेक समस्या आहेत, गावातील रस्ते, आरोग्य , शिक्षण आणि पिण्याचा पाणीपुरवठा या मूलभूत सुविधा गावाला देण्यासाठी मी निवडणूक आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील अनेक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी माझ्याकडे निवडणूक लढवावी व तुमच्या अनुभवाने गावातील प्रश्न सोडवावते, अशी मागणी केली होती, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगताना कोणत्या पार्टीकडून लढणार हे मात्र त्यांनी सांगणे टाळले, दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मध्ये दुशिंग यांचे मोठे वजन असल्याने याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत